छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या स्मृती इराणी यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर आपल्या मुलाचा एकता कपूरसोबतचा फोटो शेअर केला होता. आता स्मृती यांनी आपल्या १३ वर्षीय मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. जोइश इराणी असे तिचे नाव असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘जेव्हा तुमची मुलगी तुमची उंची गाठते, तेव्हा तुमचा आनंद गगनात मावेनासा होतो.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोघींच्या या सुरेख फोटोला इन्स्टाग्रामवर अनेक लाइक्स मिळत असून नेटीझन्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या स्मृती यांनी एकता कपूरसोबत त्यांच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटोसुद्धा क्षणार्धात व्हायरल झाला होता आणि त्याला बरेच लाइक्सही मिळाले होते.

स्मृती यांचा मुलगा जोहर १६ वर्षांचा असून २००१ मध्ये त्याचा जन्म झाला होता. त्यावेळी त्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २००३ मध्ये त्यांनी जोइशला जन्म दिला. त्यांना एक सावत्र मुलगी असून तिचे नाव शानेल Shanelle असे आहे. जुबिन आणि त्याची पहिली पत्नी मोना यांची ती मुलगी आहे.

वाचा : …म्हणून रेहमानच्या कॉन्सर्टमधून निघून गेले चाहते

स्मृती यांचा जन्म दिल्लीतील मल्होत्रा कुटुंबात झाला होता. २००१ मध्ये पारसी उद्योजक जुबिन इराणी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्या स्मृती इराणी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani shares photo of her daughter zoish on instagram