संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘मेरी कोम’ या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने या चित्रपटातील मेरी कोमची मुख्य भूमिका साकरण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांतच पोस्टर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र, प्रियंकाने त्यापूर्वीच आपल्या चाहत्यांसाठी या पोस्टरच्या काही भागाची छायाचित्रे इन्स्ट्राग्रामवर प्रकाशित केली आहेत. ही दोन्ही छायाचित्रे एकुणच चित्रपटाबद्दल आणि मेरी कोमविषयी बरेच काही सांगून जाणारी आहेत.

प्रथमदर्शनी पाहता या छायाचित्रात एका पृष्ठभागावर हाताची मुठ विद्युतवेगाने आदळताना दिसत आहे. या छायाचित्राबरोबर प्रियांकाने ‘मेरी कोमचा फर्स्ट लूक आज येत आहे. या चित्रपटातून खूप काही शिकायला मिळाले. आजपासून प्रवास सुरू होत आहे’, अशा आशयाचा संदेशसुद्धा लिहीला आहे.

तर दुसऱ्या छायाचित्रात प्रियंकाच्या गालावर जखमेचा व्रण आणि मार लागल्याने सुजलेला डोळा दाखविण्यात आला आहे. हे दोन्ही पोस्टर पाहता मेरी कोमचा एकुणच जीवनप्रवास खडतर आणि संघर्षपूर्ण असल्याचे जाणवते. मेरी कोम यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, त्यानंतर काही कारणाने या चित्रपटाचे प्रदर्शनाची तारीख ५ सप्टेंबर करण्यात आली आहे.

Story img Loader