सलमान खानच्या ‘लकी’या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा उलाल सध्या चित्रपटसृष्टीतून गायबचं झाली आहे. केवळ सलमानच्या पार्टीमध्ये स्नेहा बहुदा पहावयास मिळते. पण नुकतीच ही अभिनेत्री एका आघाडीच्या फलंदाजासोबत पार्टी करताना दिसली.
वेस्ट इंडीजचा आघाडीचा फलंदाज ख्रिस गेल याच्यासोबत स्नेहाने पार्टीचा आनंद लुटला. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी वेस्ट इंडिजच्या संघाने थोडी मजामस्ती करण्यात वेळ घालवला. त्यावेळी त्यांच्यासोबत स्नेहादेखील होती. स्नेहाने ख्रिस गेलसोबतचे छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.
स्नेहाने वेस्ट इंडीज टिमसोबत डान्स करतानाचे छायाचित्रसुद्धा प्रसिद्ध केलेयं. अभिनेत्री स्नेहाने नुकतेच दाक्षिणात्या चित्रपटात पर्दापण केले आहे.