मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करत अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्नेहा वाघ आता बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये सहभागी झाली आहे. बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणारी स्नेहा ही तिसरी स्पर्धक आहे. ‘काटा रुते कुणाला’ या मराठी मालिकेतून स्नेहा घराघरात पोहचली तर ‘ज्योती’ सह अनेक हिंदी मालिकांमधून देखील स्नेहा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्य़ा घरात मात्र आता स्नेहाला स्पर्धकांसोबतच तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत राहवं लागणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्नेहा वाघच्या एण्ट्रीसोबतच अभिनेता आविष्कार दारव्हेकरची एण्ट्री झाली आहे. अविष्कार घरात येताच स्नेहाच्या चेहऱ्यावरील बदललले हावभाव काही स्पर्धकांच्यादेखील लक्षात आले. यामागचं खरं कारण म्हणजे आविष्कार हा स्नेहाचा पहिला पती आहे. स्नेहा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेच आली होती. स्नेहाने दोन विवाह केले असून तिचा दोनदा घटस्फोट झाला आहे.
अगदी कमी वयात म्हणजेच अवघ्या १९ वर्षांची असताना स्नेहाने अविष्कारसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा वाघने तिला घरगुती हिंसाचाराचा समाना करावा लागला असून तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता. “मला काय करावं ते कळत नव्हतं. या सर्वातून बाहेर कसं पडावं हे सूचत नव्हत. मी खूप वेदना सहन केल्या आहेत. अखेर माझ्या आई-वडिलांच्या आणि बहिणीच्या मदतीने मी यातून बाहेर पडू शकले. पतीच्या मारहाणीला बळी पडून त्यातून बाहेर पडू न शकणाऱ्या महिलांबद्दल मला खूप वाईट वाटतं.” असं म्हणत स्नेहाने तिच्यावर झालेल्या अन्यायाचा खुलासा केला होता.
View this post on Instagram
अविष्कारसोबत घटस्फोट झाल्यानंतर स्नेहाला मोठ्य़ा मानसिक तणावाचा सामना करावा लागला होता. मात्र स्नेहाने अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं ठरवलं. या लग्नातून तिने स्वत:ची सुटका करून घेतली.
View this post on Instagram
त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी स्नेहाने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्नेहाने इंटेरियर डिझायन असलेल्या अनुराग सोलंकीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली मात्र हे लग्न जवळपास आठ महिनेच टिकलं. स्नेहा दुसऱ्यापतीपासून देखील विभक्त झाली.