‘राम लीला’ चित्रपटात एकत्र अभिनय केलेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या जवळकीचे किस्से सर्वश्रुत आहेत. झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील रणवीरचा अभिनय पाहून दीपिका कमालीची खूश झाली आहे. चित्रपटातील रणवीरच्या कामाने भारावून गेलेल्या दीपिकाने टि्वटरच्या माध्यमातून त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शेफाली शहा अशी अनोखी स्टारकास्ट आहे. क्रुझ ट्रिपवर निघालेल्या एका वेंधळ्या कुटुंबाची कथा चित्रपटात दर्शविण्यात आली आहे.

Story img Loader