Sobhita Dhulipala and Naga Chaitanya wedding अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि तेलुगू अभिनेता नागा चैतन्य यांचे लग्न डिसेंबर २०२४ मध्ये होणार आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या लग्नाआधीच्या समारंभाला सुरुवात झाली असून, आता त्यांच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाचे पारंपरिक निमंत्रण

सोभिता आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये दक्षिण भारताच्या पारंपरिक घटकांचा समावेश आहे. या पत्रिकेत दक्षिण भारताच्या विशेष शैलीतील मंदिर, दिवे, गाय आणि घंटा यांचा समावेश करण्यात आला आहे. वधू-वरांच्या नावांबरोबरच कुटुंबातील सदस्यांची माहितीही या पत्रिकेत देण्यात आली आहे. ४ डिसेंबर २०२४ रोजी हा लग्नसमारंभ पार पडणार आहे.

हेही वाचा…‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “निर्मात्यांचे सध्याचे…”

वऱ्हाडींसाठी खास गिफ्ट बास्केट

निमंत्रणाबरोबरच वऱ्हाडींसाठी एक खास गिफ्ट बास्केटही देण्यात येत आहे. या बास्केटमध्ये खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, कपडे, फुले ठेवण्यात आले आहेत. अधिकृतरीत्या लग्नाच्या ठिकाणाची घोषणा करण्यात आलेली नसली तरी चाहत्यांमध्ये या लग्नाबद्दल खूप उत्सुकता आहे.

लग्नाआधीच्या समारंभाची झलक

गेल्या महिन्यात सोभिताने इन्स्टाग्रामवर पसुपू दंचतमनं समारंभाचे फोटो शेअर केले होते. “गोधूम राय पसुपू दंचतमनं… आणि सुरू होतंय,” असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले होते. या समारंभासाठी तिने सोनेरी आणि हिरव्या बॉर्डरची साडी परिधान केली होती. तिच्याबरोबर घरातील महिलाही या समारंभात सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा…Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल

पसुपू दंचतमनं हा तेलुगू पारंपरिक लग्नपूर्व समारंभ आहे. यामध्ये हळद, गहू आणि दगड यांचे एकत्रित पूजन केले जाते. या विधीत वधू हळद कुटत असते आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेत असते. सोभिता आणि नागा चैतन्य यांचे लग्नाआधीचे समारंभ झाल्यानंतर आता चाहत्यांचे लक्ष त्यांच्या विवाहसोहळ्याकडे लागले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sobhita dhulipala and naga chaitanya wedding invite viral marriage in december psg