‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रकाश झोतात आला. ओंकारने या मंचावर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र त्याने या कार्यक्रमातू काढता पाय घेतला आहे. ओंकार सध्या मराठी चित्रपटांकडे वळला आहे. शिवाय ‘करुन गेलो गाव’ या नाटकात तो आता काम करताना दिसत आहे. कामाव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी ओंकार त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता.
ओंकारने काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्याला त्याच्या सिनेसृष्टीतील क्रशबद्दल प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर त्याने “माझी क्रश अशी कोणीही नाही. पण ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावालकर हिचा मी चाहता आहे”. असं म्हटलं होतं. त्यानंतर अंकिता व ओंकारने एकमेकांची भेटही घेतली होती.
अंकिताने ओंकारबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला होता. आता अंकिताच्या एका पोस्टवर चाहत्याने ओंकारबाबत कमेंट केली आहे. त्यावर अंकितानेही रिप्लाय केला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘३६ गुणी जोडी’ या कार्यक्रमात अंकिता दिसणार आहे. याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा एक सुंदर व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.
आणखी वाचा – वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला आयुष्मान खुराना, आईचा हात हातात धरत म्हणाला, “वडिलांसारखं…”
तिचा हा व्हिडीओ पाहून एका चाहतीने म्हटलं की, “ओंकार भोजने लाजला असेल”. ही कमेंट पाहून अंकिताने रिप्लाय केला. तिने स्माईल इमोजी कमेंटमध्ये पोस्ट केली. ओंकार भोजने हा अंकिताचा खूप मोठा चाहता आहे. “माझी क्रश अशी कोणीही नाही. पण कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकर या इन्स्टाग्राम स्टारचा मी खूप मोठा चाहता आहे. ती बिनधास्त, बेधडक अशी मराठी मुलगी आहे”, असे ओंकार भोजनेने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.