‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर नेहमी चर्चेत असते. तिचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. तसेच तिने केलेली वक्तव्य देखील चर्चेचा मुद्दा असतात. अशातच सध्या अंकिताचा एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे तिच्यावर टीकेचा भडीमार होतं आहे. “लोक ऐकतात म्हणून काहीही नसतं बोलायचं ताई”, “तू स्वतःला काय समजतेस?”, “अंकिता जरा आता जास्त बोलतेय”, “कोणत्याही मुलीबद्दल बोलताना विचार करून बोलं”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तिच्या या व्हिडीओवर उमटल्या आहेत. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – …म्हणून भरत जाधव यांना आहे गाड्यांची हौस; वडिलांनी व्हॅनिटी व्हॅन पाहिली होती तेव्हा…

अंकिता वालावलकरने काही दिवसांपूर्वी ‘वास्तव’ असं लिहीतं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने दुकानामध्ये काम करण्यासाठी मुलीने कशा प्रकारे नकार दिला याविषयी सांगत आहे. या व्हिडीओत ती म्हणते की, मी एक दुकान चालू केलं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. दुकान चालू केल्यापासून मी एक कामासाठी मुलगी शोधतेय. म्हणून मी माझ्या एका मित्राला सांगितलं होतं की, एक मुलगी बघ रे. जी दुकान सांभाळेल. त्याने त्याच्या एका मैत्रीणीला सांगितलं. तिने मला फोन केला आणि म्हणाली, जॉब प्रोफाइल काय असेल? मी म्हटलं, बाई आताच दुकान चालू केलंय, एवढे कठीण शब्द वापरू नकोस जॉब प्रोफाइल वगैरे. मग तिला मी तिचं शिक्षण विचारलं. तर ती म्हणाली, मी बीए आहे. मला ४७ टक्के मिळाले आहेत. त्यानंतर मी तिला आवड विचारली. मग ती म्हणाली, मला गाणी ऐकायला आवडतात वगैरे. म्हणजे जे टीपीकल आपण बायोमध्ये लिहितो ते तिने सांगितलं. मी तिला म्हटलं, तुला दुकान सांभाळावं लागेल. सकाळी एकवेळ झाडून मारावा लागेल. शिवाय देवाची पूजा वगैरे करावी लागेल. ती मला म्हणाली, मला हे जमणार नाही.” अंकिताने तिच्या खास शैलीत ही घटना सांगितली. पण नेटकऱ्यांना ती खटकली. नेटकरी तिच्यावर टीकेचा भडीमार करत आहेत.

हेही वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी सासूबाईंनी सुकन्या मोनेंना दिलं होतं खास सरप्राइज; ‘तो’ किस्सा सांगत अभिनेत्री म्हणाल्या…

एका नेटकरीनं लिहीलं, “तुला कॉर्पोरेटचा अनुभव आहे. त्यामुळे कोणाला काय काम लावायचं, एवढी अक्कल पाहिजे ना…झाडू मारायचा आहे तर तसे लोक बघ. पदवी प्राप्त झालेले लोक तुझ्या दुकानामध्ये झाडू का मारतील? प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान आहे. आणि तुला जर वाटत की, इंग्रजीमध्ये बोलून होणार आहे तर एवढं मंद कोणी राहील नाही. जागी हो. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहेस फक्त, स्वतःला मोठी उद्योजिका समजू नको.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं, “चांगल्या कामासाठी कौतुक करावे आणि वाईट वर्तनासाठी खडेबोल सुनवावेत.. मग ती कोणीही व्यक्ती असुदेत.. लोक या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत हा त्यांचा हक्कच आहे. कारण याच माणसांनी तिला मोठ केलं आहे.. आणि चुकलेल्या माणसाला रस्ता दाखवणं हे चांगलं काम आहे.. पण आजकाल कोकणी संस्कृती दाखवण्यापेक्षा माज आणि स्वतःची वाहवा करण्यावर जास्त भर दिला जात आहे या चॅनेलवर. त्यामुळे लोकांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे.” अशा अनेक टीका अंकितावर करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – “समारंभपूर्वक लग्न करणं हा माझ्या मते गुन्हा”; संजय मोने यांचं वक्तव्य, म्हणाले…

या सगळ्या टीकेनंतर अंकिताने एक प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये तिने लिहीलं की, दुकानामध्ये झाडू मारण्याचा एरिआ १०० स्क्वेअर फूट असेल हो. बाकी ठिकाणी झाडू पोहोचणारही नाही आणि माझ्याकडे काम करणारी व्यक्ती ही जास्तीत जास्त १० हजार पगार घेणारी असेल. म्हणून माफक अपेक्षा एवढीच आहे की, समोर कचरा दिसला तर डिग्री न आठवता झाडू आठवावी, ज्याचा आपण कचरा काढण्यासाठी वापर करतो.

तसेच पुढे अंकिताने लिहीलं की, १० हजारात नोकरी करणाऱ्या मुलीने किंवा मुलाने स्वाभिमानाविषयी बोलू नये आणि झाडू मारण्यात कसला स्वाभिमान कमी होतो. अंकिताच्या या प्रतिक्रियेनंतर तिला अधिक ट्रोल केलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media influencer konkan hearted girl ankita walawalkar trolled for these video pps
Show comments