१४ -१५ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या जोडीने लग्न केलं. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सतत या जोडीची चर्चा रंगली आहे. मात्र दिमाखदार पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यापेक्षा आजही एका सेलिब्रेटी जोडीचा लग्नसोहळा चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं लग्न झालं. या जोडीनेही डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य दिलं होतं. इतकंच नाही तर विरुष्काच्या लग्नातली प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे अनुष्का -विराटचं लग्न जास्त लोकप्रिय की दीपिका -रणवीरचं याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती.या चर्चांना स्कोर इंडिया ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीमुळे पुर्णविराम मिळाला आहे.

दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा अनुष्का-विराटचं लग्न सर्वाधिक लोकप्रिय आणि सोशल मीडियावरून वायरल झालं आहे. गेल्या वर्षी अनुष्का-विराटचे ११ डिसेंबरला लग्न झाले. ८ ते १४ डिसेंबर २०१७ मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार, या दरम्यान ट्विटर, वर्तमानपत्रे, व्हायरल न्यूज आणि डिजिटल न्यूज रँकिंगमध्ये त्यांनी लोकप्रियतेत सर्वाधिक म्हणजेच १०० गुण मिळवले होते आणि ते प्रथम स्थानावर होते. फेसबुकवर मात्र ६१ गुणांसह ही जोडी चौथ्या स्थानी होती.

दरम्यान, नुकतेच १४ आणि १५ नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीरचे लग्न झाले. त्या आठवड्यात ट्विटर, वायरल न्यूज आणि डिजिटल न्यूजवर १०० अंकांसह ही जोडी पहिल्या स्थानी होती. तसेच फेसबुक रँकिंगमध्ये ८८ गुणांसह ही जोडी दूस-या स्थानावर होती आणि न्यूजपेपर रँकिंगमध्ये ४५ गुणांसह तिस-या स्थानावर होती.

दोन्ही लग्नांची आकडेवारी व्यावस्थित पाहिल्यावर लक्षात येते की, विरूष्का पहिल्या स्थानावर तर दीप-वीर लोकप्रियतेत दुस-या स्थानावर आहेत. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media most popular wedding anushka and virat kohli
Show comments