जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर इतिहासार रचतोय. लवकरच हा चित्रपटात २०० कोटींचा आकडा पार करणारी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १३ वर्षांपूर्वी आलेल्या अवतारच्या या दुसऱ्या भागाची चांगलीच चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे. याबरोबरच अमेरिकन नागरिक या चित्रपटाच्या बॉयकॉटची मागणी करत आहेत. जेम्स कॅमेरून यांचं जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत आल्याने अमेरिकेत या चित्रपटाला बॉयकॉट करायची मागणी होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर ही परिस्थिती असताना आता या चित्रपटावर आणखी वेगळाच आरोप लागला आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ चॅप्टर २’ची कॉपी केल्याचे आरोप काही नेटकरी लावत आहेत. केवळ आरोपच नाही तर सोशल मीडियावर एक व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : जेव्हा चार्ल्स शोभराजला भेटायला तुरुंगात गेला होता रणदीप हुड्डा; ‘बिकिनी किलर’ने विचारलेला हा प्रश्न

या व्हिडिओमध्ये ‘केजीएफ चॅप्टर २’च्या क्लायमॅक्सदरम्यान ऐकू येणारं म्युझिक आणि ‘अवतार २’ च्या एका सीनदरम्यानचं म्युझिम अगदी हुबेहूब आहे. हीच तुलना करत एका सोशल युझरने ‘अवतार २’ हा ‘केजीएफ २’ची कॉपी असल्याचा दावा केला. यानंतर या व्हिडिओखाली बऱ्याच लोकांनी कॉमेंट करत या सोशल मीडिया युझरची कान उघडणी केली.

कॉमेंट करत लोकांनी हे म्युझिक ‘अवतार १’मध्ये सुद्धा असल्याचे दाखले देत त्याचे डोळे उघडले. शिवाय या दोन चित्रपटात तुलना न केलेली बरी असं काही नेटकऱ्यांनी स्पष्ट मत मांडलं. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून या युझर याबाबत माफीदेखील मागितली आहे. ‘अवतार २’ हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट आहे. भारतात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.

Story img Loader