आज महाशिवरात्री त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. तर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या घरी महाशिवरात्री निमित्त पूजा झाली असून त्याचा व्हिडीओ सोहाने शेअर केला आहे. पण यावेळी सगळ्यांचे लक्ष हे त्यांच्या लेकीने वेधले आहे.
सोहाने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या रील व्हिडीओमध्ये सुरुवातीला कुणाल शंख वाजवताना दिसतो. त्यानंतर काही फोटो दिसतात. यात त्यांची लाडकी लेक जेवण वाढताना दिसली आहे. इनायाच्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राजमा, भात, पालक पनीर, डाळ असे अनेक पदार्थ कुणालसमोर ठेवलेले आहेत. इनाया तिच्या वडिलांना राजमा वाढत असताना सोहाने तिचा फोटो क्लिक केला. हा व्हिडीओ शेअर करत, ‘हेरथ मुबारक. सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. सर्वांना आनंद, शांती, प्रेम लाभो. ओम नम: शिवाय’, असे कॅप्शन तिने दिले आहे.
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
आणखी वाचा : “Arrange Marriage म्हणजे मटका, मी जर लग्न केल तर…”; प्राजक्ता माळीचे वक्तव्य चर्चेत
दरम्यान, गेल्या महिन्यात सोहा आणि कुणालने त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला. जुलै २०१४ मध्ये पॅरिसमध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर २५ जानेवारी २०१५ रोजी या दोघांनी मुंबईत लग्नगाठ बांधली. तर २९ सप्टेंबर २०१७ मध्ये सोहाने इनायाला जन्म दिला.