गेल्या वर्षी पॅरिसमध्ये कुणाल खेमुने त्याची बऱ्याच काळापासूनची प्रेमिका सोहा अली खानला एंगेजमेंन्ट रिंग घातली होती. अभिनयाच्या क्षेत्रात फार काही करू न शकलेली ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या २५ जानेवारी रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने मुंबईत हे लग्न पार पडणार आहे. फार गाजावाजा न करता संपन्न होणाऱ्या या लग्नास सोहा आणि कुणालचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित असणार आहेत. दोघांचा मित्रपरिवार चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी नसलेला आहे. सोहाचा भाऊ सैफ अली खान आणि करिना कपूर यांचे लग्नदेखील नोंदणी पद्धतीनेच झाले होते. बऱ्याच काळापासून लेकीच्या लग्नाची तयारी करीत असलेल्या शर्मिला टागोरने लेकीला लग्नाची भेट देण्यासाठी मुंबईत नऊ कोटीचा फ्लॅट घेतला आहे.

Story img Loader