बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची मुलगी इनाया नौमी खेमू ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तैमूर आणि जेहच्या फोटोंसोबत इनायाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या इनायाचा एक फोटो चर्चेत आहे. ज्यामध्ये ती डोक्यापासून पायापर्यंत टॉयलेट पेपरमध्ये गुंडाळल्याचे दिसत आहे.

हा फोटो सोहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत इनाया डोक्यापासून पायापर्यंत टॉयलेटपेपरने गुंडाळल्याचे दिसत आहे. खरतरं आज १७ एप्रिल म्हणजे Easter Sunday आहे आणि याच निमित्ताने सोहाने तिची क्रिएटिव्हीटी दाखवतं इनायाला टॉयलेट पेपरने गुंडाळून Easter egg बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सोहाने हा फोटो शेअर करत “My little Easter egg is ready to hatch!!,” असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : करिश्मा कपूर पुन्हा होणार नवरी? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधान

आणआणखी वाचा : आर माधवनच्या मुलाने परदेशात भारताचे नाव उंचावले, मुलाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेता, म्हणाला…

काही नेटकऱ्यांना इनायाचा हा लूक आवडला आहेत तर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोहाने २०१५ मध्ये अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले. २०१७ मध्ये सोहाने इयानाला जन्म दिला. सोहा आणि कुणाल नेहमीच इयानायाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

Story img Loader