Sohail Khan Seema Khan Divorce : बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आणि पत्नी सीमा खान यांचा घटस्फोट होणार आहे. लग्नाच्या २४ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेल खान आणि सीमा खान आज फॅमिली कोर्टाबाहेर दिसले. त्यांचे फॅमिली कोर्टाबाहेरचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
‘ईटाइम्स’च्या वृत्तानुसार, फॅमिली कोर्टातील एका सूत्राने सांगितले की, सोहेल खान आणि सीमा खान आज न्यायालयात हजर होते. दोघांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. त्यावेळी ते दोघेही मित्र असल्यासारखे दिसत होते. फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर दोघेही आपापल्या कारमधून घराकडे निघाले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोहेलच्या आयुबाजूला बॉडीगार्ड दिसत आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे.
आणखी वाचा : “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है…”, दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
सोहेल खान आणि सीमा खान १९९८ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. २०१७ मध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, सोहेल आणि सीमा वेगळे झाल्याची माहिती समोर आली होती. ‘द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमध्ये सोहेल आणि सीमा वेगळे राहतात आणि मुलं दोघांसोबत राहतात असं दाखवण्यात आलं होतं. सीमा आणि सोहेल वेगळे राहतात हे या शोमधून स्पष्ट झाले होते.