दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नातील फोटो गुरुवारी समोर आले. रणवीर आणि दीपिकाने सोशल मीडियावर हे फोटो टाकताच क्षणार्धात ते व्हायरल झाले. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम सगळीकडेच या फोटोंची चर्चा होती. दीप-वीरने लग्नात कोणता पोशाख परिधान केला याची उत्सुकता सर्वांनाच होती. विशेष म्हणजे लग्नात वधूच्या पोशाखाकडे सर्वांचं लक्ष असतं. पण अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीरच्या पोशाखाकडे यावेळी अनेकांचं लक्ष होतं. त्यामुळे लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्याचे गमतीशीर मीम्स व्हायरल होणं साहजिक होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in