बॉलिवूडमधील वडील मुलाची जोडी वेगवेगळ्या चित्रपटातून एकाच वेळी आणि एकाच दिवशी आमने सामने आल्याचा प्रकार घडला आहे. यातील एक जण नायक म्हणून तर दुसरा खलनायक म्हणून प्रेक्षकांसमोर आले आहेत.
शुक्रवारी रजनीकांतचा बहुचर्चित ‘कोचिदियान’ आणि जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर याचा ‘हिरोपंती’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. टायगरने ‘हिरोपंती’द्वारे रूपेरी पडद्यावर ‘नायक’ म्हणून पदार्पण केले आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू होती. तर रजनीकांतच्या चाहत्यांना ‘कोचिदियान’च्या निमित्ताने दीर्घ कालावधीनंतर आपल्या ‘बॉस’चा नवीन चित्रपट पाहायला मिळणार आहे.
‘कोचिदियान’ चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे रजनीकांतची मुलगी सौेदर्या हिने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘कोचिदियान’मध्ये वडील आणि मुलगी एकत्र आले आहेत. तर ‘हिरोपंती’ आणि ‘कोचिदियान’या वेगवेगळ्या चित्रपटाद्वारे वडील आणि मुलगा दोघे आमने सामने उभे ठाकले आहेत. ‘हिरोपंती’मध्ये टायगर श्रॉफ हा नायक तर ‘कोचिदियान’मध्ये जॅकी श्रॉफ खलनायक आहे.

Story img Loader