बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेने जोर धरला असून यामध्ये दररोज नवनवीन नावं समोर येत आहेत. नाना पाटेकर यांच्यानंतर कैलाश खेर, दिग्दर्शक विकास बहल, आलोक नाथ, रजत कपूर यांच्यावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप झाले. आता संगीतकार अनू मलिक यांच्यावर गायिका सोना मोहपात्राने आरोप केले आहेत.

सोना मोहपात्राने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने गायक कैलाश खेर आणि संगीतकार अनू मलिक यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले. ‘ज्या महिला या व्यक्तीशी निगडीत आपले अनुभव सांगत आहेत त्या एकट्या नाहीत. कैलाश खेर या व्यक्तीसारखे बरेच लोक इंडस्ट्रीत आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे अनू मलिक. मी प्रत्येकाविषयी ट्विट नाही करू शकत कारण मी १८ तास काम करते. मी दुसऱ्यांवर टीप्पणी केल्यास अयोग्य ठरेल,’ अशी पोस्ट सोनाने लिहिली होती. अनू मलिकने तिचे हे आरोप फेटाळले आहेत.

#MeToo : आलोक नाथ स्त्रीलंपट, आणखी एका अभिनेत्रीचा आरोप

‘काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत ती बोलत आहे. त्या घटनेशी माझं काही घेणं-देणं नाही. मी कधीच तिच्यासोबत काम केलं नाही. तरीसुद्धा त्या प्रकरणात सोना माझं नाव मध्येच खेचत आहे. मी तर तिला कधी भेटलोसुद्धा नाही,’ असं स्पष्टीकरण अनू मलिक यांनी दिलं.

Story img Loader