अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकप्रकारे #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे. काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका फोटो जर्नलिस्टने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच पार्श्वगायिका सोना मोहापात्रानेही कैलास खेरवर आरोप केले आहेत.

मी आणि कैलाश एका कार्यक्रमाच्या चर्चेसाठी पृथ्वी कॅफेमध्ये भेटलो होते. यावेळी आमची चर्चा सुरु असताना त्यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला. इतकंच नाही तर तू खूप सुंदर आहेस. तुझ्या नवरा नशीब आहे. तू एका अभिनेत्यापेक्षा एक संगीतकाराची (राम संपत) जोडीदार म्हणून निवड केली, अस कैलाश खेर म्हणाल्याचं सोनाने सांगितलं

पुढे ती असंही म्हणाली, ‘कैलाश खेर यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आयोजकांच्या मार्फत माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, अजून किती महिलांची माफी मागाल ?  जर आता माफी मागायला सुरुवात केली तर आयुष्य कमी पडेल’.

दरम्यान, काही दिवसापूर्वी एका फोटो जर्नलिस्टनेही कैलाश खेरवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. संबंधित महिला कैलाशच्या घरी मुलाखतीसाठी गेली असता ही घटना घडल्याचं या महिलेने म्हटलं होत. त्यानंतर आता सोना माहोपात्राने कैलाश यांच्यावर आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

Story img Loader