सोनाक्षी सिन्हाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अभिनेता परितोषच्या कानशिलात लगावली आहे. परितोषने सोनाक्षीच्या चित्रपटातील एक डायलॉग म्हटला होता, त्यानंतर तिने त्याला कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार ‘केस तो बनता है’ या शोच्या सेटवर घडला आहे.
‘केस तो बनता है’ या शोमध्ये अनेक कलाकार हजेरी लावतात. त्यांच्यावर काही आरोप केले जातात, प्रश्न विचारले जातात आणि त्यांना त्याची उत्तरं द्यायची असतात. अलिकडेच एका एपिसोडमध्ये सोनाक्षी या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. यावेळी परितोषची एंट्री होते आणि आणि सोनाक्षी त्याला तिच्या चित्रपटातील डायलॉग म्हणायला सांगते. त्याने ‘थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है’ हा डायलॉग म्हटला, त्यानंतर सोनाक्षीने त्याला कानाखाली मारली आणि त्या डायलॉगला अनुसरून भीती वाटते की नाही, असं विचारलं. सोनाक्षीने शोच्या स्क्रिप्टचा भाग म्हणून गमतीने त्याला मारलंय.
दरम्यान, सोनाक्षीने मारताच तिथे उपस्थित रितेश देशमुख आणि वरुण शर्मा जोरजोरात हसू लागतात. आधी या शोमध्ये शाहिद कपूर, विकी कौशल, पंकज त्रिपाठी, सारा अली खान, अनन्या पांडे यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याशिवाय या शोमध्ये अनिल कपूर, करण जोहर, करीना कपूर, रोहित शेट्टी आणि वरुण धवन, संजय दत्त हे कलाकारही पाहायला मिळतील. शो ‘केस तो बनाता है’ चा हा भाग Amazon Mini TV वर प्रसारित केला जाईल.