बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. आज सोनाक्षी सिन्हाचा ३४ वा वाढदिवस आहे. अभिनया व्यतिरिक्त सोनाक्षी बऱ्याचवेळी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अमिताभ बच्चन यांच्या केबीसीत रामायणाच्या प्रश्नावर उत्तर न देऊ शकल्यामुळे सोनाक्षी ट्रोल झाली होती.
कौन बनेगा करोडपती ११ मध्ये सोनाक्षीने हजेरी लावली होती. यादरम्यान शोचे होस्ट अमिताभ यांनी तिला विचारले की, ‘रामायणानुसार हनुमानाने संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती?’ या प्रश्नाचे उत्तर सोनाक्षीला माहित नव्हते आणि तिने लाईफलाइनचा वापर केला. या प्रश्नावर सोनाक्षीला अडकल्याचे पाहून अमिताभ यांनाही आश्चर्य वाटले होते. त्यावेळी बिग बी सोनाक्षीला म्हणाले, “तुझ्या घराचे नाव रामायण आहे. तुझ्या वडिलांचे नाव शत्रुघ्न आहे आणि तुझ्या दोन्ही भावांची नावे लव आणि कुश आहेत.” यानंतर सोशल मीडियावर सोनाक्षीवर बरेच मीम्स व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले.
आणखी वाचा : “तुझं सर्वात Best Reel…”, जिनिलियाचा शक्ती कपूर यांच्यासोबत धमाल डान्स व्हिडीओवर रितेशची कमेंट चर्चेत
आणखी वाचा : KK ला श्रद्धांजली वाहण्यावरुन बादशाहला ट्रोलरने विचारलं, “तू कधी मरणार?”; बादशाह म्हणाला, “तुम्ही जे…”
सोनाक्षीच्या चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर ती आता Roar या चित्रपटातून OTT वर पदार्पण केले. यामध्ये सोनाक्षी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती ‘डबल एक्सएल’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी तिला १५ते २० किलो वजन वाढवावे लागणार आहे. यात हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.