अक्षय कुमार आणि हनी सिंगनंतर आता दबंग-गर्ल सोनाक्षी सिन्हादेखील ‘वर्ल्ड कब्बडी लिग’मधील एका संघाचा मालकी हक्क प्राप्त करणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या ९ तारखेपासून लंडनमध्ये ‘वर्ल्ड कब्बडी लिग’ची सुरुवात होत आहे. इंग्लंडमधील ‘दी हायरे ग्रुप’बरोबर सोनाक्षीने ‘वर्ल्ड कब्बडी लिग’मध्ये खेळणाऱ्या ‘युनायटेड सिंग्ज’ संघाची मालकी स्वीकारली आहे. याविषयी बोलताना सोनाक्षी म्हणाली, ‘वर्ल्ड कब्बडी लिग’चा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अशाप्रकारच्या उपक्रमात मी पहिल्यांदाच सहभागी होत आहे. कब्बडी हा गतीशील खेळ असून, या लिगमध्ये काही रोमांचक क्षण अनुभवायला मिळतील, असे वाटत असल्याचेदेखील ती म्हणाली. ‘वर्ल्ड कब्बडी लिग’ला उपस्थित राहाता यावे यासाठी सोनाक्षीने आपल्या चित्रीकरणाच्या तारखांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे.

Story img Loader