सोनाक्षी सिन्हा व हुमा खुरेशी या दोघींचा नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असंच दिसत आहे. या दोन टॉपच्या अभिनेत्रींचा ‘डबल एक्सएल’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: ‘डबल एक्सएल’चा विषय इतर चित्रपटांपेक्षा हटके असल्याचं टीझरद्वारे दिसून येतं.
चित्रपटाच्या टीझरमध्ये सोनाक्षी व हुमा आपल्या वजनाबाबत बोलताना दिसत आहे. तसेच वाढत्या वजनामुळे कपड्यांची साइजही वाढते आणि यादरम्यान काय घडतं? याबाबत या दोघी बोलत आहेत. तसेच बॉडी शेमिंगविषयी संवाद साधताना सोनाक्षी-हुमा लक्षवेधी संवाद म्हणत आहेत. ३० सेकंदाचा हा टीझर आजच्या पिढीतील महिलांना खूप काही सांगून जातो.
पाहा टीझर
या चित्रपटाच्या टीझरला काही तासांमध्ये लाखोच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. दोघींनीही या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली असल्याचं टीझरवरून लक्षात येतंच. चित्रपटासाठी सोनाक्षी व हुमाने बरंच वजनदेखील वाढवलं होतं. अभिनेता जहीर इकबालही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसेल.
आणखी वाचा – शाहरुख खानच्या बायकोचा लेकाला रिलेशनशिपबाबत विचित्र सल्ला, म्हणाली, “लग्नापूर्वी पाहिजे तितक्या मुलींना…”
एका मुलाखतीदरम्यान जहीरने म्हटलं होतं की, हुमा व सोनाक्षीने या चित्रपटासाठी १५ ते २० किलो वजन वाढवलं होतं. त्यासाठी दोघींनीही आपलं डाएट बदललं आणि खूप पदार्थही खाल्ले. ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचं दिग्दर्शन सतराम रमाणी यांनी केलं आहे. येत्या १४ ऑक्टोबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.