बॉलिवूडच्या जवळपास सगळ्याच अभिनेत्री झीरो फिगरच्या प्रेमात असताना ‘दबंग’ मधून बॉलिवूड प्रवेश करणाऱ्या सोनाक्षीने मात्र हट्टाने त्यास नकार दिला होता. फॅशन डिझायनिंग करणाऱ्या सोनाक्षीला वजन कमी करायला लावून सलमानने ‘दबंग’ची नायिका केले होते. मात्र, त्यानंतर केवळ लोक टीका करतात म्हणून मी वजन मुळीच कमी करणार नाही, असे सोनाक्षीने कित्येकदा ठणकावून सांगितले होते. आता मात्र स्वत:चाच हा आग्रह मोडून सोनाक्षीने आणखी वजन कमी केले आहे.
सोनाक्षीने वजन कमी केले पाहिजे, असा सूर सर्वत्रच लावला जायचा. त्यामुळे वैतागलेली सोनाक्षी ‘मी जशी आहे तशीच चांगली आहे. प्रेक्षकांनीही मला नायिका म्हणून असेच स्वीकारले हवे’, असे काहीबाही बोलू लागली. सततच्या होणाऱ्या या टीकेला कंटाळूनच सोनाक्षीने पुन्हा वजन कमी करण्याचा पर्याय निवडला असे बोलले जाते. पण, तिने मात्र या गोष्टीला नकार दिला आहे. कोणाच्याही टीकेला उत्तर द्यायचे म्हणून मी हे केलेले नाही, असे सोनाक्षी म्हणते.
मी मुळातच खूप जिद्दी आहे. एखादी गोष्ट मी मनावर घेतली की ती मी पूर्ण करतेच. वजन कमी करण्याच्या बाबतीतही हेच झाले आहे. मला रोज व्यायाम करायचा मनापासून कंटाळा आहे. त्यात मी खवय्यीही आहे. त्यामुळे खाणे कमी कर, रोज जिम गाठ असे प्रकार मला आवडत नव्हते. मात्र, आता वजन कमी करायचेच असे ठरवून कितीही थकले असले तरी जिम गाठतेच, असे तिने सांगितले. पण, वजन कमी करायची गोष्ट तिने एवढी मनावर का घेतली? हे अजून गुलदस्त्यातच आहे.
सोनाक्षीने शेवटी झीरो फिगर केलीच !
बॉलिवूडच्या जवळपास सगळ्याच अभिनेत्री झीरो फिगरच्या प्रेमात असताना ‘दबंग’ मधून बॉलिवूड प्रवेश करणाऱ्या सोनाक्षीने मात्र हट्टाने त्यास नकार दिला होता.
First published on: 11-04-2014 at 12:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha in new zero figure size