बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या केशरचनेची, मेकअपची आणि अन्य गोष्टींची काळजी घेणाऱ्या सदस्यांचे अनेकवेळा कौतुक करताना आढळून येते. तिला सुंदर दिसण्यासाठी मदत करणाऱ्या या चमूचे छायाचित्र तिने टि्वटरवर प्रसिद्ध केले असून, टि्वटरवरील संदेशात ती म्हणते, माझ्या #NeverOffDuty टीमला भेटा!! दिव्या शितल, निलू, गंगाधर आणि शाम! यांच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. तुमचे #NeverOffDuty हिरो कोण आहेत? सध्या ती ‘हॉलिडे : अ सोलजर इज नेव्हर ऑफ ड्युटी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, अक्षय कुमार, गोविंदा आणि सुमीत राघवन यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात सोनाक्षी बॉक्सिंगच्या रिंगणात मुष्ठियुद्ध करताना दिसणार आहे. अलिकडेच एका पारितोषिक वितरण सोहळ्याच्या आधीदेखील सोनाक्षीने आपल्या या काळजीवाहू चमूचे छायाचित्र सोशल मिडियावर प्रसिद्ध केले होते.
 

Story img Loader