कतरिना कैफ ने ‘धूम-३’ चित्रपटात अॅक्शनची दृष्ये साकारली असून, मुष्टीयोध्दा मेरी कोमच्या जिवनावर बनत असलेल्या चित्रपटात मुष्टीयोध्याची भूमिका साकारत असलेल्या प्रियांका चोप्राने ‘डॉन’ चित्रपटाच्या मालिकेत मारधाडीची दृष्ये केली आहे. तर, दीपिका पदूकोणने ‘चांदनी चौक टू चायन’ चित्रपटात ‘मार्शल आर्ट’ अॅक्शनप्रकारातील दृष्ये लिलया पार पाडली आहेत. आता बॉलिवूडची शॉट-गन गर्ल सोनाक्षी सिन्हा या अॅक्शन दिवांमध्ये सामील झाली आहे. काहीशी जाडसर शरिरयष्टी असलेल्या सोनाक्षीला बहूतांश चित्रपटांतून ठराविक बाजाच्या भूमिका साकारण्यासाठी टिकेला सामोरे जावे लागले आहे. टीव्हीवरील एका मुलाखतीत तिच्या शरिरयष्ठीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विनोदाने ती म्हणाली होती, मी येथे हिरो बनण्यासाठी आले आहे, साईज झिरोसाठी नव्हे! आता ही दबंग अभिनेत्री ‘हॉलिडे’ आणि ‘तेवर’ या तिच्या आगामी चित्रपटात अॅक्शन दृष्ये साकारताना दिसणार आहे. यासाठी तिने आपल्या शरिरयष्टीवर देखील मेहनत घेतली आहे. अर्जुन कपूरबरोबरच्या ‘तेवर’ चित्रपटात तिला मारधाडीची दृष्ये साकारायची असून, चित्रपटातील एका दृष्यात ती पाच माळ्याच्या इमारतीवरून उडी मारताना दिसणार आहे. हे दृष्य साकारतानाचे छायाचित्र तिने इन्स्टाग्राम या सोशल साइटवर पोस्ट केले असून, छायाचित्राखाली दिलेल्या संदेशात ती म्हणते, माझे वडील नेहमी मला फिअरलेस नाडिया म्हणायचे. अता मला कळले का ते 😛 ५ माळ्याच्या इमारतीवरून उडी मारण्यास सज्ज! ‘हॉलिडे’ या तिच्या आगामी चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रसिध्द झाला असून, यात सोनाक्षीचा बास्केटबॉल मैदानावरचा आणि रेसिंग ट्रॅकवरचा आवेश पाहायला मिळतो. ठरावीक प्रकारातील भूमिका साकारणासाठी टिकेची धनी झालेल्या सोनाक्षीने ‘लूटेरा’ चित्रपटातील पाखीची व्यक्तिरेखा साकारून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता ‘हॉलिडे’ आणि ‘तेवर’ या तिच्या आगामी चित्रपटांद्वारे पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना आणि टिकाकारांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी ती सिध्द झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा