बॉलिवूडमधील अतिशय व्यस्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एका पाठोपाठ एक चित्रपटांचे शुटिंग करण्याचा धडाका लावला आहे. २०१३ हे सोनाक्षीसाठी संमिश्र वर्ष ठरले. ‘लुटेरे’ आणि ‘आर…राजकुमार’ या तिच्या चित्रपटांनी चांगली कामगिरी केली, तर ‘बुलेट राजा’ हा चित्रपट सपशेल पडला. असे असले तरी २०१४ साठी तिने कंबर कसली असून, ‘तेवर’ या चित्रपटासाठी तिने अर्जुन कपूरबरोबर चित्रीकरणास सुरूवात केली आहे. याबाबतच्या टि्वटरवरील संदेशात ती म्हणते, नवा दिवस… नवा चित्रपट! आज, गुंडा अर्जुनबरोबर काम करायला सुरूवात केली. जयपूरकडे प्रयाण! मला शुभेच्छा द्या 🙂
अर्जुन कपूरचे वडील बॉनी कपूर या चित्रपटाची निर्मिती करीत असून, अमित शर्मा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘तेवर’ हा चित्रपट ‘ओक्कडू’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. मिळालेल्या माहिती नुसार, या चित्रपटात अर्जुन कपूर आग्रास्थित कब्बडीपटूची भूमिका साकारत आहे.
सोनाक्षी सिन्हाकडे प्रभू देवाचा ‘अॅक्शन जॅक्सन’ हा अजय देवगणसोबतचा आणि अक्षय कुमारबरोबर ‘हॉलिडे’ हे चित्रपटदेखील आहेत.

Story img Loader