बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप नेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाने आपल्या वडिलांच्या विजयात मदत करणा-या सर्व समर्थकांचे आभार मानले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी पटना साहीब येथून लोकसभा निवडणूकीची जागा जिंकली आहे.
दबंग अभिनेत्री सोनाक्षीने सर्वांचे आभार मानण्यासाठी ट्विटरची मदत घेतली असून या ट्विटमध्ये #AbkiBaarModiSarkar या टॅगचा वापर केला आहे.

तसेच, सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हानेदेखील सर्व शुभेच्छुकांचे आणि भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

Story img Loader