‘रॅंबो राजकुमार’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा प्रभुदेवासोबत नृत्य करताना दिसणार आहे. या अधी ‘ओ माय गॉड’ या चित्रपटातील एका ‘आयटम सॉंग’मध्ये तिने प्रभुदेवाबरोबर नृत्य केले आहे. ‘रॅंबो राजकुमार’ चित्रपटातील या गाण्यात ती सहअभिनेता शाहिद कपूरबरोबर सुद्धा नृत्य करताना दिसणार आहे. सोनाक्षीने ट्विट केलंय की, ‘रॅंबो राजकुमार’ चित्रपटातील एका गाण्यासाठी आज सकाळी प्रभुदेवा आणि शाहिद कपूरबरोबर नृत्य केले. ‘रॅंबो राजकुमार’ हा एक अॅक्शन चित्रपट असून, याचे दिग्दर्शन प्रभुदेवा करीत आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Story img Loader