बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा रुपेरी पडद्यावर जोरदार अॅक्शन करताना नजरेस पडणार आहे. लवकरच ती हाय अॅक्शन ड्रामा करताना पाहायला मिळणार असून, सोनाक्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. ए. आर. मुरुगादास आणि अॅक्शन दिग्दर्शक अनल अरासू यांच्या या आगामी प्रकल्पाचा सोनाक्षी हिस्सा असल्याचे बोलले जात आहे. अनलबरोबर ती चौथ्यांदा काम करताना दिसणार असून, अनलने तेलगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटात जबरदस्त अॅक्शन दृष्ये साकारली आहेत. या आधी सोनाक्षीने ‘दबंग २’, ‘रावडी राठोड’ आणि ‘हॉलिडे’ चित्रपटात अनलबरोबर काम केले आहे. सोनाक्षीचा हा चित्रपट स्त्री केंद्रित असून, मार्च महिन्यात चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होईल. पहिल्यांदाच आपण पूर्णपणे अॅक्शन करताना नजरेस पडणार असल्याचे सांगत या चित्रपटाविषयी बोलताना सोनाक्षी म्हणाली, याआगोदर सुद्धा मी अनलबरोबर काम केले आहे, परंतु त्यावेळी त्यानी सलमान खान आणि अक्षय कुमारसाठी अॅक्शन दृष्ये साकारली होती. यावेळी ती संधी मला मिळाली असल्याने मी खूप उत्साही आहे.

Story img Loader