बॉ़लीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ‘आर.राजकुमार’चा सहकलाकार आणि तथाकथित प्रियकर शाहीद कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हैदरच्या शूटींगचे काम पूर्ण झाल्यानंतर शाहीद काश्मिर येथून गोव्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला आहे. सोनाक्षीने ट्विटर या सोशल साइटवर ट्विट केले आहे की, “हॅपी बर्थडे शाहिद कपूर!. गोवामे गंदी बात और पार्टी ऑल नाइट ओकेके :p मजा कर.”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा हे बॉलीवूडचे नवे लवबर्डस आहेत. दोघांची भेट प्रभूदेवाच्या ‘आर. राजकुमार’ या सेटवर झाली होती. तेव्हपासून ते एकत्र आहेत. सोनाक्षी ‘तेवर’च्या शूटींगसाठी अर्जुन कपूरसोबत व्यस्त आहे. असे नसते तर ती नक्कीच शाहीदचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्याला गेली असती, तर त्याबाबत आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

Story img Loader