मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा विवाहबंधनात अडकली. तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली-कुणाल पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनालीनं काही दिवसांपूर्वीच तिच्या दुसऱ्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता तिने पुन्हा एकदा आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.
सोनाली कुलकर्णी आणि तिचा पती कुणाल बेनोडेकर यांच्या दुसऱ्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच होती. हे दोघं या लग्नाचे फोटो कधी शेअर करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. सोनाली आणि कुणाल यांच्या दुसऱ्या लग्नाचा सोहळा चाहत्यांना लवकरच प्लॅनेट मराठीवर पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी सोनालीची नवी इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे.
आणखी वाचा- “तुझी पँट कुठे आहे?” कियारा आडवाणीच्या शॉर्ट ड्रेसची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
सोनाली कुलकर्णीने तिच्या इन्सग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात कुणाल आणि सोनाली सप्तपदी घेताना दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करताना सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिलं, “सोनाली- कुणाल : A Wedding Story पहिली झलक 8 ऑगस्टला ! लवकरच… फक्त ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर !” याशिवाय या पोस्टच्या बॅकग्राउंडला सोनाली बोलताना ऐकू येतेय, “आमचे राखून ठेवलेले क्षण आता साठवून ठेवण्यासाठी प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे आमची वेडिंग स्टोरी. आग्रहाचं निमंत्रण बरं का. नक्की या.”
आणखी वाचा- “राखून ठेवलेले हे क्षण…” अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केला लग्नाचा पहिला फोटो
तसेच याआधी सोनालीनं तिच्या इन्स्टाग्रामवर या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. यातील एका फोटोत कुणालने सोनालीचा हात हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोत सोनाली ही सप्तपदी चालताना दिसत आहे. या फोटोत सोनाली आणि कुणाल या दोघांचे चेहरे दिसत नाही. पण त्यांचे हे फोटो पाहून सोनालीचे लग्न पारंपारिक पद्धतीने पार पडल्याचे दिसत आहे. सोनालीने छान हिरव्या रंगाची पैठणी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिने हातावर आणि पायावर अगदी नववधूप्रमाणे छान मेहंदही काढली आहे.
दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्या दोघांनी पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि तिने पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा पारंपरिक पद्धतीने लगीनगाठ बांधली.