सनई चौघडे… फुलांच्या रंगीबेरंगी माळा… लग्नमंडप… जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा… पाहुण्यांची लगबग… जेवणात मराठमोळा बेत… हा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा रंगला होता लंडनमध्ये आणि तोही आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजेच सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाण्याचे निमंत्रणही दिले होते. आता या लग्नसोहळ्याची झलकही चाहत्यांच्या भेटीला आली असून कधी हा सोहळा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर पाहाता येईल, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

खरंतर अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी पूर्ण करत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ११ ऑगस्ट रोजी झळकणारा हा लग्नसोहळा काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स

आणखी वाचा- “चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा पंजाबीच का?” नागराज मंजुळेंच्या प्रश्नावर आमिर खानने दिलं उत्तर

प्लनेट मराठीने इन्स्टाग्रामवर सोनालीच्या लग्नसोहळ्याचा ट्रेलर शेअर करताना लिहिलं, “सोनालीच्या पहिल्याच लग्नाची दुसरी गोष्ट! पाहा सोनालीच्या लग्नाची झलक…” या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला सोनालीचा आवाज आहे. ती म्हणते, “मला लहानपणापासून लग्नाचं खूप आकर्षण होतं आणि मला चार वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करायचं होतं. बऱ्याच अडचणी आल्या, करोना, व्हिसाची समस्या, लग्न रद्द झालं. पण अखेर सगळं ठीक झालं आणि अनेक वर्षं उराशी बळगलेलं माझं स्वप्न पूर्ण झालं.”

सोनाली कुलकर्णी म्हणते, “ आपले लग्न धुमधडाक्यात व्हावे, हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. माझेही होते. परंतु जागतिक महामारीमुळे आम्ही रजिस्टर लग्न केले. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आले नाही. त्यामुळेच सर्व काही आलबेल झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर आधुनिक पद्धतीने रिसेप्शनही केले. खरंतर कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यतील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे, म्हणूनच मी या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवले आणि यासाठी प्लॅनेट मराठीसारखे उत्तम ओटीटी मला मिळाले, ज्यामुळे माझा लग्नसोहळा जगभरातील मराठी प्रेक्षक पाहू शकतील.”

आणखी वाचा- सोनाली कुलकर्णीच्या वेडिंग स्टोरीची पहिली झलक, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “सातासमुद्रापार लंडनसारख्या देशात सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांचे लग्न पार पडले होते. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराच्या लग्नातील धमालमस्ती अनुभवायची असते. सोनालीचा चाहतावर्ग पाहता आम्ही तिचा संपूर्ण लग्नसोहळा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच तिच्या या सोहळ्याचे ट्रेलर झळकले असून ते प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे. लवकरच चाहत्यांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर लग्नाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.”

Story img Loader