औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई. त्यांच्याच जीवनावर आधारीत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचा मुहूर्त आज संपन्न झाला आहे.

हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या “मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई” या पुस्तकावर आधारीत असून, “मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.
आणखी वाचा- Video : ‘रुख से जरा..’ निधनाआधी सोनाली फोगाट यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची!

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Vishwa hindu parishad
“आजारातून मुक्त होण्याचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न”, ख्रिसमस कार्यक्रम हिंदू संघटनांनी उधळला!

मराठी साम्राज्याचा औरंगजेबाच्या मनात पुन्हा दबदबा निर्माण करणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. सोनाली तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “औरंगजेब सारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या बलाढ्य मोगल दिल्लीपती पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा झोपवणाऱ्या “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” चित्रपटाचा मुहूर्त संपन्न! तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा असू द्या.”

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ”छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच ह्या चित्रपटाद्वारे आपला लखलखीत इतिहास आम्ही प्रेक्षकांच्या समोर आणीत आहोत. प्रेक्षकांना हा अनोखा चित्रपट नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे.”

आणखी वाचा- Video : ‘…मै झुकेगा नही साला’ सोनाली कुलकर्णीच्या नवऱ्याचा ‘पुष्पा’ स्टाईल उखाणा

दरम्यान मुंबई मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली असून या चित्रपटासाठी चित्रनगरी मध्ये भव्य सेट उभारला आहे. संपूर्ण सेट, हा इतिहासातील पराक्रमांमध्ये न्हाऊन निघाला आहे. ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘मंत्रा व्हिजन’ निर्मित हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम कथानकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध विषयांवरचे दर्जेदार चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ कायम अग्रेसर असतं.

Story img Loader