९० च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि मनमोहक हास्याने चाहत्यांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेला ओळखले जाते. सोनाली बेंद्रेला चार वर्षापूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर तिने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. कॅन्सरच्या उपचारासाठी ती न्यूयॉर्कला गेली होती. तसेच यादरम्यान तिचे केसही गळाले होते. पण आता सोनाली कॅन्सरमधून बरी झाली आहे. कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनाली बेंद्रे तब्बल ४ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. सोनाली ही लवकरच ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर’च्या पाचव्या सीझनमध्ये दिसणार आहे.

सोनाली बेंद्रे ही ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर’चे ५ वे सीझनची परिक्षक म्हणून काम करणार आहे. तिच्यासोबत नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि अभिनेत्री मौनी रॉय हे देखील परिक्षक म्हणून दिसणार आहेत. सोनालीने या कार्यक्रमाचे शूटींगही सुरु केले आहे.

Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
lakhat ek amcha dada fame isha sanjay and juee tanpure dance on uyi amma
Video : सूर्या दादाच्या बहि‍णींचा जबरदस्त डान्स! सुपरहिट ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकल्या, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
amit bhanushali birthday on set villain priya new look grabs attention
Video : ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अर्जुनच्या वाढदिवसाची धमाल! खलनायिका प्रियाच्या नव्या लूकने वेधलं लक्ष, मिळाली मोठी हिंट
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?
madhuri dixit dances on dola re dole song at wrap up party
Video : २२ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! पार्टीचं कारण होतं खूपच खास…

नुकतंच सोनालीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आनंद झळकताना दिसत आहे. या फोटोत सोनालीचे लांबसडक केस पाहायला मिळत आहे. त्यासोबत तिने तिच्या ड्रेसला मॅचिंग मेकअपही केला आहे. सोनालीने शेअर केलेला फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. सोनाली बेंद्रेने याला असे हटके कॅप्शन दिले आहे. ‘माझ्यासारखेच रंगीत’ असे तिने कॅप्शन देताना म्हटले आहे.

तिच्या या फोटोवर ताहिरा कश्यप आणि मनीषा कोइरालानेही कमेंट केली आहे. त्या दोघींनीही तिच्या फोटोवर हार्ट इमोजी शेअर केला आहे. ताहिरा कश्यप आणि मनीषा कोइराला या दोघींनाही करोनाची लागण झाली आहे.

अंकितावर भारी पडल्या आई आणि सासूबाई, संगीत समारंभाचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सोनालीने तिच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाची विशेष प्रशंसा करण्यात आली होती. सोनालीला कर्करोगासारख्या असाध्य रोगाचा सामना करावा लागला होता. मात्र यावर तिने यशस्वीरित्या मात केली.

Story img Loader