अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाचा अभिनय असलेल्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ चित्रपटात काम करून एक दशकानंतर सोनाली बेंद्रे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटात ती मुमताझची भूमिका साकारत आहे. पाहुण्या कलाकाराची भूमिका करत असलेल्या सोनालीचे मिलन लुथ्राशी घनिष्ट संबंध असून, या मैत्रिपूर्णसंबंधांसाठी तिने चित्रपटात काम करण्याचे मान्य केले. मिलन लुथ्रानी ‘संभाला है मैने’ या ‘नाराझ’ चित्रपटातील सोनालीच्या पहिल्या गाण्याचे चित्रिकरण केले होते. सोनालीच्या या मैत्रिपूर्ण संबंधांव्यतिरिक्त तिच्या सासूची आणि शोभा कपूरची चांगली मैत्री आहे.  तिच्या आयुष्यातील मिलन आणि तिची सासू या दोन व्यक्तिबद्दल असलेल्या आदरासाठी तिने या चित्रपटात मानधन न घेता काम केले आहे.

Story img Loader