sonaliमानवी कंगोऱ्याचं दर्शन घडवत नातेसंबधाचा अर्थ उलगडून दाखवणारा ‘कौल मनाचा’ हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा मुहूर्त प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते नुकताच मुंबईत संपन्न झाला. ‘सदिच्छा फिल्म्स’ प्रस्तुत ‘कौल मनाचा’ चित्रपटाचे निर्माते राजेश पाटील असून, दिग्दर्शन भिमराव मुडे यांचे आहे. मेकअपमन ते निर्माता अशी राजेश पाटलांची झेप नक्कीच कौतुकास्पद आहे, असं सांगत सोनालीने चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. मुहूर्तप्रसंगी चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाची कथा भिमराव मुडे व श्वेता पेंडसे यांची असून, मानवी मनाच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे. भिमराव मुडे यांचा स्वतंत्र दिग्दर्शनातला हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची गीते मनोज यादव यांनी लिहिली आहेत, तर संगीत रोहन-रोहन यांचं आहे. ‘कौल मनाचा’ या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, विजय गोखले आणि विजय चव्हाण इत्यादी कलावंतांसह आशुतोष गायकवाड, गणेश सोनावणे, लव विसपुते, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे या बालकलाकारांचादेखील समावेश आहे.

Story img Loader