अभिनेत्री सोनाली बेंद्रेने यशस्वीरित्या कर्करोगावर मात केली. आता पुन्हा एकदा ती नव्या जोमाने कामाला लागली आहे. पण तिच्यासाठी हा संपूर्ण प्रवास सोपा नव्हता. न्यूयॉर्कमध्ये तिने कर्करोगावर उपचार घेतले. या कठीण काळामध्ये तिने फक्त सकारात्मक पद्धतीने विचार केला. उद्याचा दिवस पाहणार की नाही याची शाश्वती नसताना सोनालीने हिंमतीने या आजाराशी सामना केला. या संपूर्ण प्रवासादरम्यानचा अनुभव सोनालीने सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – VIDEO : एरव्ही शांत पण बायकोसमोर बेभान होऊन नाचला राजकुमार राव, अभिनेत्याचा पार्टीमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात सोनालीने हजेरी लावली होती. यावेळी कर्करोगावर आपण मात कशी केली? जेव्हा कर्करोगाचं निदान झालं तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती हे तिने सांगितलं. सोनाली म्हणाली, ” मी कर्करोगाशी लढा दिला. माझ्या आयुष्यामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना जर कोणाला प्रोत्साहन देत असेल तर ते खूप चांगलं आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट करा असं बऱ्याचदा बोललं जातं. मी तेच केलं. केस नव्हते पण आज फक्त केस गळत आहेत. उद्या जगणार की नाही हे देखील माहित नव्हतं. शिवाय जगलेतरी पुढे माझा लूक कसा असेल याची कल्पना देखील नव्हती. किमोथेरपीनंतर कित्येकजणांचं रुप बदलेलं आपण पाहिलं आहे. किमोथेरपीमध्ये जरी लूक बदललं नाही तरी आपलं वय वाढत आहे लूक बदलणारच याची कल्पना होती. शिवाय ज्या क्षेत्रात मी काम करते तिथे दिसण्यावर सगळं चालतं आणि ते असायचा पाहिजे कारण तुम्ही कसे दिसता हे स्क्रिनच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचतं. काहीही झालं तरी मी जगणारच असा सकारात्मक विचार मी केला. मी माझ्या मुलालाही सांगितलं शंभर टक्के मी पुन्हा येणार.”

सोनाली पुढे बोलताना म्हणाली, “कर्करोग झाला हे समजताच मला नेहमी सकाळी उठल्यावर असं वाटायचं की हे स्वप्न आहे. पण नंतर मी भानावर यायचे आणि कळायचं की ही सत्य परिस्थिती आहे. माझ्याबाबतीतच हे का घडलं? मीच का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात गर्दी करत होते.”

आणखी वाचा – VIDEO : ए आर रहमान यांच्या लेकीचा ग्रँड रिसेप्शन सोहळा, बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींची हजेरी

“कर्करोग झाल्याचं समजताच मी चौथ्या दिवशी उपचारासाठी भारताबाहेर गेले. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं याक्षणी तु आयुष्यात दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाही. फक्त तू आता तुझा विचार कर. माझ्या पतीबरोबर मी भारताबाहेर गेले. डॉक्टरला भेटलो. तेव्हा सगळे रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाले तुझी फक्त ३० टक्केच जगण्याची शक्यता आहे. त्याचक्षणी मला असं वाटलं डॉक्टरला एक बुक्का द्यावा. एवढा मला त्यांचा राग आला. पण यादरम्यानच्या काळात मी नकारात्मक गोष्टींपासून लांब राहिले आणि पुन्हा परत आले.” सोनालीचा हा संपूर्ण प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonali bendre talk about her cancer and actress share her experience during this period inspirational story kmd