मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोनालीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देत असते. ७ मे २०२१ रोजी सोनाली दुबईत कुणाल बेनोडेकरशी विवाहबद्ध झाली. लॉकडाऊनमुळे त्यांनी हा विवाह रजिस्टर पद्धतीने केला होता. त्यावेळी कुणाल आणि सोनाली या दोघांचेही आई-वडील, नातेवाईक हजर राहू शकले नव्हते. पण त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी कुणाल व सोनाली अगदी साग्रसंगीत पद्धतीने पुन्हा एकदा बोहल्यावर चढले.
आणखी वाचा : “भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे आणि…” गायक राहुल देशपांडेचं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर
या शाही विवाहाला दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. हा विवाहसोहळा नक्की कसा पार पडला? यात काय स्पेशल होते हे नुकतंच समोर आलं आहे. त्यांच्या लग्नाचा संपूर्ण व्हिडीओ ‘प्लॅनेट मराठी’वर तीन भागांमध्ये प्रदर्शित झाला. यात लग्नाबरोबरच सोनालीने तिच्या कुटुंबाबरोबर असलेलं नातं आणि तिच्या आई वडिलांबद्दलही काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
सोनाली कुलकर्णीची आई पंजाबी आहे तर वडील मराठी आहेत. सोनालीवर बालपणीपासूनच दोन्ही संस्कृतींचे संस्कार झाले आहेत. सोनालीची आई पंजाबी असल्याने सोनालीला मराठीबरोबरच पंजाबीही उत्तम बोलता येतं. या दोघांसाठी सोनालीच्या मनात विशेष स्थान आहे. तिने ते बऱ्याचदा चाहत्यांशी शेअरही केलेलं आहे. पण आता लग्नाच्या निमित्ताने पहिल्यांदा खास सोनालीसाठी तिच्या आईने एक खास गोष्ट केली. त्याबद्दल सोनालीने खुलासा केला आहे.
हेही वाचा : “कुणालचा जन्म लंडनचा…” सोनाली कुलकर्णीने नवऱ्यासाठी घेतला हटके उखाणा
लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने तिच्या आईने इतक्या वर्षात प्रथमच नऊवारी साडी नेसली होती. ही गोष्ट स्वतः सोनालीने लग्नाच्या व्हिडीओमध्ये सांगितली आहे. “माझ्या लंडनमध्ये मराठी पद्धतीने पार पडलेल्या विवाहसोहळ्यात सर्वांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते. या सगळयांमध्ये माझ्या पंजाबी आईने तिच्या आयुष्यात पहिल्यांदा नऊवारी साडी नेसली,” असं सोनाली म्हणाली.
दरम्यान अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीने पूर्ण केली आहे. आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.