मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने मराठी प्रेक्षकांसोबतच देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत सोनालीने तिला सुरुवातीच्या काळात वर्णभेदाचा सामना करावा लागल्याचा खुलासा केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ई टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीने काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केलाय. या मुलाखतीत ती म्हणाली, “मला बॉलिवूडमध्ये रंग भेदाचा सामना करावा लागला नाही. मात्र पुण्यामध्ये मला या गोष्टीचा सामना करावा लागलाय. बॉलिवूडमध्ये तर माझं कौतुक झालं, मी जेव्हा पुण्यात पहिल्यांदा ऑडिशनसाठी गेले होते. तेव्हा मी गिरीश कर्नाड यांना भेटले. तेव्हा तिथे आणखी एक मुलगी तिच्या आईसोबत आली होती. त्या मुलीच्या आईने मला तू इथे का आली आहेस? असा प्रश्न विचारला होता. मला त्यांचा उद्देश लक्षात आला नव्हता.”

हे देखील वाचा: “लोकांना बिकिनीतील फोटो चालतो, स्तनपानाचा फोटो टाकला तर केवढा ड्रामा”; ट्रोलर्सना अभिनेत्रीचं उत्तर

पुढे सोनाली म्हणली, ” त्यानंतर त्या महिला मला म्हणाल्या ‘तू आरशात तुझा चेहरा पाहिला आहेस का? काळ्य़ा मुली कॅमेरात चांगल्या दिसत नाहीत.” या महिलेच्या बोलण्याने सोनालीला त्यावेळी खूप लाजल्या सारखं वाटल्याचं ती म्हणाली. त्यानंतर सोनाली गिरीश कर्नाड यांना भेटली. त्यांच्यात चांगल्या गप्पा झाल्या. सोनाली पुढे म्हणाली, “गिरिश काकांनी माझं नावं आणि माहिती विचारली. त्यांनी माझं चांगलं कौतुक केलं. त्यानंतर त्या महिलेने केलेल्या अपमान जनक वक्तव्याचं माझ्यासाठी फारसं महत्व उरलं नाही. असंही मी ते फार गंभीरपणे घेतलं नसतं.” असं सोनाली म्हणाली.

सोनाली कुलकर्णीने मराठी सिनेमा, रंगमंचासह हिंदी सिनेमातून आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत.