अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. ज्यामध्ये तिने भारतीय मुलींना आळशी म्हटलं होतं. मुलींना चांगले पैसे कमावणारा मुलगा पती किंवा बॉयफ्रेंड म्हणून हवा असतो, पण त्या स्वतः मात्र काहीच कमावत नाहीत, असं ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यानंतर काहींनी तिचं समर्थन केलंय, तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. तिचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
Open Letter: “आम्हाला आळशी म्हणण्यापेक्षा…” सोनाली कुलकर्णीला भारतीय मुलीचं खुलं पत्र
आता मात्र सोनालीने या प्रकरणावर मौन सोडलं आहे. खरंतर कालपासूनच हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. आता मात्र सोनालीने यावर एक मोठा मेसेज पत्राच्या स्वरूपात ट्वीट करत शेअर केला आहे. यामध्ये तिने कोणत्याही महिलेला दुखवायचा तिचा हेतू नव्हता हे स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘भीड’चा ट्रेलर पुन्हा प्रदर्शित; संतापलेले नेटकरी म्हणाले “पंतप्रधान मोदी घाबरले…”
सोनाली तिच्या पोस्टमध्ये म्हणते :
“मला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे तो पाहून मी भारावून गेले आहे. यासाठी मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. खासकरून प्रेस आणि मीडियातील लोकांचे माझ्याशी संपर्क साधण्यात जे परिपक्व आचरण बघायला मिळाले त्यासाठी मी त्यांची आभारी आहे.
एक महिला म्हणून मी सांगू इच्छिते की इतर कोणत्याही महिलेला दुखवायचा माझा हेतु नव्हता. तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा किंवा नाराजी माझ्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे खूप आभार मानते, आणि आशा करते यापुढेही अशीच खेळीमेळीची चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण सुरू राहील.
माझ्या क्षमतेनुसार मी केवळ स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला पाठिंबा द्यायचा प्रयत्न करत आहे. जर आपण स्त्रिया सर्वसमावेशक आणि एकमेकांप्रती सहानुभूतीपूर्ण असू तरच आपण विचारांनी तंदुरुस्त आणि आनंदी समाज निर्माण करू शकू.
नकळतपणे मी कोणाचं मन दुखावलं असेन तर मी त्यांची मनापासून माफी मागते. ब्रेकिंग न्यूज किंवा हेडलाईन्समधून दिखावा करणं हे मला कधीच पटत नाही आणि मी तशी व्यक्ती नाही. मी प्रचंड आशावादी आहे आणि आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही दाखवलेल्या संयम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार. या घटनेतून मला खूप काही शिकायला मिळालं आहे.”
सोनालीच्या या पोस्टची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तिच्या या मोठ्या मेसेजवर तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. सोनालीला कारणाशिवाय ट्रोल करणाऱ्यांना आणि तिला पाठिंबा देणाऱ्या लोकांनाही सोनालीने अत्यंत समर्पक शब्दांत उत्तर दिलं आहे.