मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार सुरू होती. अखेर प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोनालीचा हा विवाहसोहळा ३ भागांच्या मालिकेच्या स्वरुपात प्रसारित करण्यात आला. सोनाली आणि कुणाल यांनी २०२० मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. पण त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनाली आणि कुणाल यांच्या लंडनमधील शाही विवाहसोहळ्याआधी पुण्यात तिच्या ग्रहमख आणि केळवणाचा कार्यक्रम पार पडला होता. सोनालीच्या लंडनच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसणाऱ्या अशा सर्वच मित्रपरिवाराने तिच्या ग्रहमख आणि केळवणाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सोनालीने कुणालसाठी हटके उखाणा घेतला होता. या उखाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

आणखी वाचा- जेव्हा अक्षयच्या आई समोर नग्नावस्थेत आला नातेवाईक, ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा

ग्रहमख आणि केळवणाच्या कार्यक्रमात कुणालसाठी खास उखाणा घेताना सोनाली म्हणाली, “कुणालचा जन्म लंडनचा, राहतो दुबईत, मला मात्र आवडतं पुणे, एवढी भूक लागलीय मरणाची आणि हे बघा सगळे म्हणतात नाव घे म्हणे…” तिच्या या हटके उखाण्यावर उपस्थित पाहुण्यांनीही हसून दाद दिली. सध्या सोनालीच्या या हटके उखाण्याची सर्वत्र चर्चा आहे.

आणखी वाचा- दुबईत साखरपुडा का केला? खुद्द सोनाली कुलकर्णीनेच सांगितले कारण..

दरम्यान अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीने पूर्ण केली आहे. आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.