सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी सोनमच्या लग्नाची तारीख जाहीर करत कपूर कुटुंबीयांनी आनंदाची बातमी दिली. सध्या कपूर कुटुंबात या लग्नसोहळ्याचा जल्लोष असून जोरदार तयारी सुरू आहे.

बॉलिवूडच्या या बहुचर्चित लग्नसोहळ्याचा ई- वेडिंग कार्ड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ई- वेडिंग कार्डवरून विवाहस्थळ आणि विविध कार्यक्रमांची माहिती मिळत आहे. ७ मे रोजी मुंबईतल्या बीकेसी इथल्या सनटेक सिग्नेचर आयलँड येथे मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर ८ मे रोजी सकाळी ११ वाजता बँड्रा बँडस्टँडजवळील रॉकडेल इथं लग्नसोहळा पार पडणार आहे. त्याच दिवशी रात्री ८ नंतर ‘द लीला’ या हॉटेलमध्ये लग्नाची पार्टी आयोजित करण्यात आली आहे.

अॅमेझॉन कर्मचाऱ्यापासून ते ३००० कोटींच्या संपत्तीचा मालक, जाणून घ्या सोनमच्या ‘आनंद’बद्दल

अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या ठिकाणी हा विवाहसोहळा संपन्न होणार असून बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांची त्याला उपस्थिती असेल यात काही शंका नाही. ‘शाह एक्सपोर्ट’ या देशातल्या सर्वांत मोठ्या निर्यात कंपनीचा व्यवस्थापकीय संस्थापक आनंद अहुजाशी सोनम ८ मे रोजी विवाहबद्ध होणार आहे. २०१४ मध्ये या दोघांची भेट झाली होती आणि पहिल्या भेटीनंतर महिनाभरातच आनंदने सोनमला प्रपोज केलं होतं. त्यानंतर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये सोनमच्याच लग्नाची जोरदार चर्चा होती. अखेर तो मुहूर्त ठरला आहे आणि ८ मे या दिवसाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Story img Loader