बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली. काही दिवसांपूर्वीच सोनमने एका गोंडस बाळाला जन्म दिला. स्वतः सोनमनेच एक खास पोस्ट शेअर करत आपल्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं असल्याचं सांगितलं. आता सोनमला आपल्या मुलासह रुग्णालयातून घरी परतली आहे.

आणखी वाचा – आनंद दिघे खरंच बाळासाहेबांची पूजा करायचे का? प्रसाद ओकने सांगितला होता ‘तो’ किस्सा

सोनमने गुड न्यूज दिल्यानंतर कपूर कुटुंबिय आनंदात आहे. सोनम आपल्या मुलाला रुग्णालयातून घरी घेऊन येतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनिल कपूर यांच्या राहत्या घरी सोनम आपल्या मुलाला घेऊन पोहोचली. यादरम्यान पापाराझी छायाचित्रकारांनी सोनम पती आनंद आहुजासह घरी येताना त्यांना घेरलं.

पाहा व्हिडीओ

इतकंच नव्हे तर पारंपरिक पद्धतीने सोनमच्या मुलाचं स्वागत करण्यात आलं. आनंद मुलाला घेऊन घरात प्रवेश करण्यापूर्वी त्याची नजर काढण्यात आली. यावेळी कपूर कुटुंबातील मंडळी देखील उपस्थित होती. इतकंच नव्हे तर आनंदने आनंदामध्ये मिठाईचं देखील वाटप केलं. कपूर कुटुंबियांनी बाळाचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी देखील केली होती.

आणखी वाचा – राजू श्रीवास्तव शुद्धीवर आलेच नाहीत, कुटुंबातील व्यक्तीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

तसेच बाळाच्या आगमनासाठी घराबाहेर खास सजावट देखील करण्यात आली होती. यावेळी सोनमने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तसेच आनंदने देखील पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं होतं. सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. परदेशात सोनमचा डोहाळे जेवणाचे कार्यक्रम थाटामाटात पार पडला होता. आता सोनम-आनंदच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली आहे.

Story img Loader