बॉलिवूड अभिनेता सोनम कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम सध्या पती आनंद अहुजासोबत त्याच्या दिल्लीच्या घरी राहते. त्यांच्या राहत्या घरात दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे. सोनमच्या घरातून कोटींरुपये लंपास केल्याची म्हटले जातं आहे.
सोनमच्या या दिल्लीच्या घरी १. ४१ कोटींची चोरी झाली आहे. याप्रकरणी सोनमच्या सासूने तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तुघलक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल असल्याने नवी दिल्ली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत अनेक पथके तयार केली आहेत.
आणखी वाचा : आराध्याने साकरली सीतेची भूमिका, राम नवमीच्या आधी फोटो झाले व्हायरल
सोनमच्या घरात २५ नोकरांशिवाय ९ केअर टेकर, ड्रायव्हर आणि माळी आणि इतर कर्मचारीही काम करतात. पोलीस सर्वांची चौकशी करत आहेत. क्राइम टीम व्यतिरिक्त एफएसएल टीम पुरावे गोळा करण्यात गुंतलेली आहे. आता पर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गुप्त ठेवले होते. मात्र, हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे.
नवी दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमचे सासरे, २२ अमृता शेरगिल मार्ग येथे राहतात. येथे त्यांच्या आजी सासू सरला आहुजा, मुलगा हरीश अहुजा आणि सून प्रिया आहुजा यांच्यासोबत राहतात. सरला अहुजा यांनी व्यवस्थापक रितेश गौरासोबत २३ फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलीस स्टेशन गाठले आणि त्यांच्या खोलीतील कपाटामधून दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार केली. ११ फेब्रुवारी रोजी कपाट तपासले असता दागिने व रोख रक्कम गायब होती. सरला अहुजा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी दोन वर्षांपूर्वी दागिने तपासून कपाटात ठेवले होते.
आणखी वाचा : “मी पुन्हा शेंगा विकेन पण…”, कच्चा बादाम फेम गायकाला होतोय पश्चाताप
पोलीस आता मागील एक वर्षाचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तुघलक रोड पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. सोनम कपूरचा पती आनंद अहुजा काका सुनीलसोबत कॅलिफोर्नियामध्ये राहतो. तो वारंवार इथे येत-जात असतो. अहुजा कुटुंबाची साई एक्सपोर्ट्स या कपड्यांची कंपनी आहे.