बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच आई झाली आहे. सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. एक पोस्ट शेअर करत सोनम कपूरने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. सोनमच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबीय सध्या आनंद सेलिब्रेट करत आहेत. मात्र आई झाल्यानंतर सोनम मात्र सोशल मीडियावर भलतीच ट्रोल होत आहे. गरोदरपणात एका मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमुळे सोनमला ट्रोल केलं जात असून आता यावर तिने सडेतोड उत्तर दिलंय.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनम म्हणाली, “मी आता अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देणे बंद केलं आहे. मला असं वाटतं की अशा गोष्टींवर मला प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. हे चांगलं आहे की, वय आणि अनुभव यामुळे मी अधिक समजूतदार झाले आहे. मला माहित आहे की मी सेलिब्रेटी आहे. लग्जरी आयुष्य जगते. त्यामुळे माझ्याबाबतीत असं घडतं. खरं तर, आता माझ्याकडे याबाबत तक्रार करण्याचे कोणतंच कारण नाही. त्यामुळे माझ्या मागे कोणी माझ्याबद्दल काही नकारात्मक बोलत असेल तरीही मला त्यामुळे फरक पडत नाही.
आणखी वाचा- पूजा सावंतला करायचंय ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडशी लग्न!

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

सोनम पुढे म्हणाली, “जर मी माझं शरीर आणि स्त्रित्वाचा आनंद साजरा करण्यासाठी काही केलं किंवा काही बोलले असेन तर यामुळे कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण मी याआधी काळी वर्तुळं, पीसीओएस, वाढलेलं वजन, प्रेग्नन्सीमध्ये येणारे स्ट्रेच मार्क्स यांसारख्या मुद्द्यांवरही सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडियावर बिनधास्तपणे भाष्य केलं आहे.”

दरम्यान सोनमने मुलाला जन्म दिल्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. सोनमने हे फोटोशूट वोग या मासिकासाठी केलं होतं. या फोटोमध्ये तिचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. अंतरवस्त्र परिधान न करता तसेच बेबी बंप दाखवताना सोनम यामध्ये दिसत आहे. तिचा हा लूक पाहूनच नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे.

आणखी वाचा- “अंगप्रदर्शन करण्याची गरज काय?” अंतर्वस्त्र परिधान न करता फोटोशूट केल्यामुळे सोनम कपूर ट्रोल

अंगप्रदर्शन करण्याची गरज काय?, अशाप्रकारचं फोटोशूट करून काय मिळवलं? याला फॅशन म्हणत नाहीत अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सोनम आता पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तसेच तिच्या या हटके फोटोशूटमुळे सेलिब्रिटींनी बेबी बंप दाखवणं गरजेचं असतं का? असा प्रश्न देखील नेटकरी विचारत आहेत. मग यावर बेधडकपणे बोलणारी सोनम शांत कशी राहील. तिनेही या टीकाकारांना उत्तर देत चांगलंच खडसावलं आहे.

Story img Loader