अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. तिने या दिवसांमध्ये खास फोटोशूट देखील केलं. आता सोशल मीडियावर तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगत आहे. लंडनमध्ये सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डोहाळे जेवणामध्ये सगळं काही खास होतं. सोनमची बहीण रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

आणखी वाचा – ‘ब्रम्हास्त्र’ सुपरहिट की फ्लॉप?, चित्रपटाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “हा चित्रपट तर…”

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तिच्यासाठी अगदी आठवणीतला असावा म्हणून बहिण रियाने विशेष मेहनत घेतली होती. तसेच Leo Kalyan या गायकाने या कार्यक्रमामध्ये सोनमचं सुपरहिट गाणं ‘मसककली मसककली’ गायलं. हे गाणं सोनमने या पार्टीदरम्यान खूप एण्जॉय केलं. या गाण्यादरम्यानचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leo Kalyanने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सोनमच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला गाणं गाण्याची संधी मिळाल्याने Leo Kalyan देखील खूश आहे. सोनमने या कार्यक्रमासाठी गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. तसेच तिचा लूक यावेळी अगदी उठून दिसत होता. ती संपूर्ण कार्यक्रम अगदी मनसोक्त एण्जॉय करताना दिसली.

जेवणापासून ते अगदी डेकोरेशनपर्यंत सगळं या पार्टीमध्ये अगदी खास होतं. शिवाय कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुणे मंडळींना तिने खास भेटवस्तू देखील दिली. सोनम गरोदरपणातील सुंदर दिवस एण्जॉय करताना दिसते. सध्या ती पती आनंद आहुजाबरोबर लंडनमध्ये एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे.

Story img Loader