बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. एक पोस्ट शेअर करत सोनम कपूरने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. सोनम कपूरच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबाच्या घरात मोठा आनंद पाहायला मिळत आहे. नुकतंच तिच्या बाळाची पहिली झलकही समोर आली आहे. पण तुम्हाला माहितीये का? अभिनेते अनिल कपूर यांना त्यांच्या नातवाची प्रचंड भीती वाटते. सोनम कपूरने बाळाच्या जन्मापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनम कपूरने गरोदर असल्याची गुडन्यूज दिल्यापासून ती कायमच चर्चेत होती. तिचे गरदोरपणातील फोटोशूटचीही कायमच चर्चा पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी सोनम कपूरने एका मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिच्या वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. त्यात ती म्हणाली होती की, “माझ्या वडिलांना त्यांच्या होणाऱ्या नातवाची प्रचंड भीती वाटते. कारण त्यांना स्वत:ला आजोबा व्हायचे नाही.”
“मला तो माझ्या भावाप्रमाणे वाटला होता पण…”; ‘अशी’ होती सोनम कपूर-आनंद आहुजाची पहिली भेट

“माझे वडील खूप घाबरले आहेत. कारण त्यांना होणारा नातू आजोबा म्हणून हाक देणार आहे आणि त्यांना ते नको आहे. अनेक वर्षांपासून ते स्वत:ला आमचे पालक आहेत असे समजत नाही. पण जेव्हा मी त्यांना गरोदर असल्याची गुडन्यूज दिली, तेव्हा ते फार भावूक झाले”, असे ती म्हणाली.

सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक आली समोर, बहिणीने शेअर केले फोटो

त्यापुढे तिने सांगितले, “मी जेव्हा त्यांनी ही गुडन्यूज दिली तेव्हा ते चंदीगडमधील जुग जुग जियो या चित्रपटाचे शूटींग करत होते. ही बातमी कळताच माझे आई वडील दोघांनी अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. माझे वडील फार धार्मिक नाहीत. पण दर्शन घेतल्यानंतर जेव्हा माझ्या आईने विचारले की तुम्ही कोणासाठी प्रार्थना करत आहात, तेव्हा ते पटकन म्हणाले नातवासाठी!”

दरम्यान सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता. त्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकतंच सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आता प्रसूतीनंतर सोनम जवळपास ६ महिने मुंबईत तिच्या पालकांसोबत राहणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor believes dad anil kapoor is scared about the next phase nrp