बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते. सोनम ही अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. सोनमने संजय लीला भन्साळी यांच्या सावरियॉं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आज याच सोनमचा वाढदिवस आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

सोनमचा जन्म ९ जून १९८५ रोजी मुंबईतल्या चेंबूरमध्ये झाला. जुहू इथल्या आर्यविद्यामंदिर शाळेत तिने शिक्षण पूर्ण केलं. शालेय जीवनापासूनच तिला बास्केटबॉल आणि डान्सची खूप आवड आहे. जॅज आणि कथ्थकचं तिने प्रशिक्षणसुद्धा घेतलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन इथून तिनं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

अनिल कपूरची लेक असूनही सोनलला बॉलिवूडमधील करिअरसाठी संघर्ष करावा लागला होता. तिने कधीही तिच्या वडिलांची किंवा कुटुंबात असलेल्या कोणत्याही व्यक्तीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यासाठी मदत घेतली नाही. सुरुवातीला सोनम संजय लीला भन्साळी यांची असिस्टंट म्हणून काम करत होती. ब्लॅक या चित्रपटासाठी सोनमने त्यांच्यासोबत काम केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सोनमचं वजन हे तब्बल ८६ किलो होतं. बरीच मेहनत घेत, वर्कआऊट करत तिने हे वजन कमी केलं आणि ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये रणबीर कपूरसोबत तिने भूमिका साकारली. पण अपेक्षित यश तिला मिळालं नाही.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

२००९ मध्ये ‘दिल्ली ६’ या चित्रपटातील ‘मसक्कली’ सोनम अनेकांनाच भावली. पण बॉक्स ऑफीसवर हा चित्रपटसुद्धा दणक्यात आपटला. ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘आयशा’ यांसारख्या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र इथेही तिला अपेक्षित यश मिळालं नाही. पण फॅशन जगतात तिचा वावर उल्लेखनीय ठरत होता.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

तिच्या अभिनय कौशल्यावर प्रश्न निर्माण होऊ लागले. अखेर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रांझना’ चित्रपटाने तिच्या विस्कटलेल्या करिअरची घडी बसवली असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘नीरजा’ हा चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला. अभिनय आणि फॅशन विश्वात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या सोनमने प्रियकर आनंद अहुजाशी लग्न केलं.

 

Story img Loader