बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनमचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सोनम सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच सोनमने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमुळे सोनम ट्रोल झाली आहे.
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे ब्रालेटमधले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोत सोनमने गुलाबी रंगाची ब्रालेट परिधान केली आहे. सोनमचे हे फोटो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिची स्तुती केली आहे. मात्र, एका नेटकऱ्याने तिला ट्रोल केले आहे. तो नेटकरी सोनमच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘तुला नक्की काय दाखवायचं आहे?’
आणखी वाचा : बिग बॉस मराठी ३ : मीरा आणि सोनालीमध्ये झाली हाणामारी?
दरम्यान, सोनम सगळ्यात शेवटी एके वर्सेस एके या चित्रपटात दिसली होती. त्या आधी सोनम जोया फॅक्टरमध्ये दिसली होती. सोनमने सांवरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर याशिवाय सोनम ‘दिल्ली-6’, ‘खूबसूरत’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘रांझणा’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे.