पाकिस्तानच्या चित्रपट सेंसॉर बोर्डाने धनुष आणि सोनम कपूर यांचा अभिनय असलेल्या ‘रांझना’ या हिंदी चित्रपटवर बंदी घातली. चित्रपटात काही वादग्रस्त दृश्ये असल्याचे कारण देत येथील केंद्रीय चित्रपट सेंसॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शनाच्या काही काळ आधी या चित्रपटावर बंदी जाहीर केली. पाकिस्तानमध्ये चित्रपट प्रदर्शित करणा-या आईएमजीसी ग्लोबल एंटरटेन्मेंटचे मुख्य कार्यकारी आधिकारी अमजद रशीद यांनी ही माहिती दिली. या आधी पाकिस्तानने ‘एक था टायगर’ आणि ‘एजंट विनोद’ या चित्रपटांवरदेखील वादग्रस्त दृश्ये आणि पाकिस्तानविरोधी भावना दाखविल्याचे कारण देत बंदी घातली होती. रशीद म्हणाले, सेंसॉर बोर्डाकडून मिळालेल्या पत्रात चित्रपटात मुस्लिम मुलीचे अनुचित रूप दाखविण्यात आले असून, ती एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडल्याचे दाखविण्यात आल्याचे म्हटले आहे. आनंद राय दिग्दर्शित ‘रांझना’ हा चित्रपट जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानात प्रदर्शित होणार होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा